टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज पोस्ट ऑफिसजवळ मधूचा स्टॉल आहे. मधू प्रभाकर शानभाग, असं त्याचं नाव. कोकणी माणसाच्या हाताला किती चव असते, हे मधूकडे मिळणारे पदार्थ खाल्ल्यावर कळतं. आठवड्यातून दोन दिवस मधूकडं मटार उसळ मिळते, मंगळवारी आणि शुक्रवारी.
मधूच्या स्टॉलचं वैशिष्टय म्हणजे रोज बदलता मेन्यू. न्याहारीसाठी रोज एकच पदार्थ खाऊन कोणी कंटाळू नये, म्हणून त्यानं डोकं लढवून रोज बदलता मेन्यू ठेवलाय. सोमवार, गुरुवार आणि शनिवार इडली, उडीद वडा सांबार-चटणी, खिचडी काकडी, उपवास भेळ असा मेन्यू असतो. बुधवार आणि रविवार मिसळ आणि भजी तर मंगळवार आणि शुक्रवार आधी म्हटल्याप्रमाणं मटार उसळ, भजी आणि अननस शिरा. आठवडाभर पोहे मिळतातच. मधूकडे मिळणाऱया पोह्यांवर सॅम्पल किंबा सांबार टाकून दिलं जातं. त्यामुळं कांदा पोह्याला वेगळीच चव लागते. अननस शिरा ही देखील मधूची खासियत. पल्प न वापरता ताजा अननस वापरून हा शिरा केला जातो. साध्या तुपात केलेला हा मऊसूत शिरा खायला मधुर लागतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आब्यांचा शिरा केला जातो.
http://72.78.249.124/esakal/20100705/5470340725089418295.htm
July 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment