पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी, संयोजकांकडे चिठ्ठय़ा धाडून, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या श्री. पु. ल. देशपांडे यांना बोलण्याचा आग्रह केला.
ऐनवेळी पुलंनी केलेले हे भाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले होते.
हे अप्रकाशित राहिलेले भाषण पुलंच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त (१२ जून ) दै. लोकसत्ताने छापले आहे.
"मी एकदा म्हटलं होतं की, अत्र्यांना त्यांच्या मास्तरांनी ‘बे एके बे’ हा पाढा न शिकवता ‘दोन हजार एके दोन हजार’, ‘दोन हजार दुणे चार हजार’ हाच पाढा शिकवला असावा. आम्हाला म्युनिसिपालिटीच्या शाळेतल्या मास्तरांना दोन म्हणतानासुद्धा आपण जास्त सांगतोय, असं वाटतं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कुणास ठाऊक?"
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=77194:2010-06-11-10-22-10&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
June 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment