June 13, 2010

लोणार सरोवर

लोणार सरोवर जागतिक वारसा म्हणून घोषित व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक तरतुदींसह घोषणा केली आहे. 


लोणार सरोवराच्या परिसरात वनस्पती, पुरातत्व, जैवविज्ञान, पर्यावरण, भौगोलिक, खगोलशास्त्रीय आणि सांस्कृतिक स्वरूपाची कितीतरी आश्चर्ये आपल्याला खुणावतात.  हजारो वर्षांची उपेक्षा पचविणाऱ्या या सरोवराचं नाव चंद्रावर असलेल्या अवशेषांशी असलेल्या साधम्र्यामुळे अचानक जगासमोर आलंय.


 पण लोणार सरोवर नक्की कोठे आहे , आणि त्याला अचानक जागतिक वारशाचा दर्जा देण्याची शिफारस करण्याचे प्रयोजन काय हेही कित्येकांना माहीत नाही. 
काही निवडक खगोलप्रेमींना जरी लोणार हे वितानतीर्थ वाटत असले तरी सामान्यांपर्यंत लोणारची महती पोहोचलेली नाही. 


जागतिक दर्जाचा हा नैसर्गिक ठेवा आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यत आहे, पण खुद्द बुलढाणा आणि लोणार सरोवरातल्या परिसरात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना आजही त्याचे महत्त्व माहीत नाही. 
 ५० हजार वर्षांपूर्वीचा हा अमूर्त जागतिक आश्चर्याचा ठेवा उपेक्षा सोसूनही विश्वाला खुणावतो आहे.
http://www.loksatta.com/lokprabha/20100528/vidnyan.htm

No comments:

Post a Comment