कूकरची शिट्टी होऊ देऊ नका!
शरद काळे, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई
दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो.
विज्ञानाला पुस्तकांमध्ये बंदिस्त करून ठेवल्यामुळे अनेक घोळ होतात.
केवळ अंधश्रद्धाच आपल्या समाजाचे नुकसान करीत आहेत असे नाही; तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हेही तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक नुकसानकारक आहे.
.....
...प्रत्येक गृहिणीचा आडाखा हा शिट्टय़ांच्या संख्येशी निगडीत असतो. भातासाठी दोन, डाळीसाठी तीन, राजम्यासाठी चार किंवा अधिक शिट्टय़ा झाल्या की कूकर बंद केला जातो.
कधीकधी आठ-दहा शिट्टय़ासुद्धा होताना आढळतात.
पण ही पद्धत अतिशय अवैज्ञानिक आहे.
... कूकरची शिट्टी केल्यामुळे ही वाफ तिचे कार्य होण्याच्या आधीच बाहेर फेकली जाते व पुन्हा अधिक इंधन खर्च होऊन नव्याने वाफ बनते.
दुसऱ्या शिट्टीला पुन्हा ती वाफ वाया जाते!
असे होत होत शेवटी जो पदार्थ शिजतो त्यातील जीवनसत्त्वे, त्याला असलेला परिमळ हे हवेत निघून गेलेले असतात. आणि आपण हकनाक अधिक इंधन जाळलेले असते.
तेव्हा कूकरची शिट्टी होऊ देऊ नका!
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61077:2010-04-09-05-25-33&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194
April 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment