April 27, 2010

आयपीएल फायनल

‘चला, एकदाचा फायनलचा दिवस उजाडला.
मला वाटलं होतं च्यायला मीडिया आता आयपीएल बंद पाडूनच थांबणार बहुधा.’
‘वेडा आहेस का तू?
मीडियाला कोणतीही गोष्ट थांबवायची नसते, ती अधिकाधिक काळ चालवायची असते.’
‘अरे पण भीती वाटते ना!
 च्यायला आपण आपले हजारो कोटी गुंतवले; आणि आपल्या शब्दाखातर आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनीही गुंतवले, सगळं शेकलं असतं आपल्यावर.’
‘तू पण  ना..!
करावे तसे भरावेचे दिवस संपले राजा!
आता करावे आणि बिनधास्त खिसे भरावे, हा नवा रुल आहे.
...बाकी साहेबांना मानलं आपण.
 जिथं तिथं नावं आली छापून फक्त आपली आणि कमाई मात्र साहेबांनी आपल्या एवढीच केली.’
‘हो, पण तुला ठाऊक आहेना, साहेब म्हणजे डिझास्टर मॅनेजर आहेत.
संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग!
 ते त्याची किंमत वसूल करत असतात!’
...

No comments:

Post a Comment